रायगड : निवडणुकीच्या तयारीला वेग
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी तत्परतेने तयारी सुरू करून आपापसात समन्वय साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जा
निवडणुकीच्या तयारीला वेग; जिल्हाधिकारींच्या सूचना सर्व विभागांना


रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी तत्परतेने तयारी सुरू करून आपापसात समन्वय साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत निवडणुकीच्या पूर्वतयारीची सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. रविंद्र शेळके, प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच नवी मुंबई परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, “निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सर्व विभागांनी मनुष्यबळाचा अद्ययावत डाटाबेस तयार ठेवावा. मतदान केंद्रे मतदारांसाठी सुलभ आणि सोयीस्कर असावीत. अपंग मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक अधिकाऱ्याने आपले मतदान केंद्र स्वतः तपासावे आणि तेथील सुविधा सुनिश्चित कराव्यात.” तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने वेळेत आवश्यक कारवाई करून परस्पर संपर्क कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्व यंत्रणांनी एकदिलाने व जबाबदारीने काम केल्यास निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande