“घरोघरी जा, पक्षाची ध्येयधोरणे पोहचा” — चित्रलेखा पाटील
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। “शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या न्यायासाठीच हा पक्ष उभा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या दारात येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही अफवांना ब
“घरोघरी जा, पक्षाची ध्येयधोरणे पोहचा” — चित्रलेखा पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन


रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। “शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या न्यायासाठीच हा पक्ष उभा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या दारात येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही अफवांना बळी न पडता सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे, घरोघरी जाऊन पक्षाचे ध्येय-धोरण मतदारांपर्यंत पोहचवावे,” असे आवाहन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले. अलिबाग येथील शेतकरी भवनात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

चित्रलेखा पाटील म्हणाल्या, “शेकाप हा जनतेच्या प्रश्नांवर लढणारा पक्ष आहे. स्मार्ट मीटर, वीजबिल, रस्त्यांवरील खड्डे अशा विषयांवर शेकापने सातत्याने आवाज उठविला आहे. गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या न्यायासाठी लढणे हीच आमची ओळख आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “आगामी निवडणुकांसाठी संघटनेला अधिक बळकट करून शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व आघाड्यांनी समन्वयाने काम करावे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आपली बांधिलकी कायम ठेवेल.” शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या, “प्रशासकीय राजवटीत अनेक प्रश्न सोडविण्याचे काम शेकापने केले आहे. बैठकीस शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत, ॲड. निलम हजारे, ॲड. परेश देशमुख आदींसह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande