बीड - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी
बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली असुन सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या
बीड - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी


बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली असुन सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे. त्यांनी पिडीत कुटूंबाची भेट घेवून केली आहे.

कागदे यांनी सांगितले की, पीआय गोपाळ बदने, प्रशांत बनकर यांच्यासह फलटण पोलीस विभागातील डीवायएसपी सुनील महाडिक, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्षक जायपत्रे, वैद्यकीय अधिकारी अंशुमन धुमाळ यांना सहआरोपी करावे. या अधिकाऱ्यांनी आत्महत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. रिपाइंने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande