
नांदेड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरूवार 30 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
गुरूवार 30 ऑक्टोबर रोजी बेलोरा विमानतळ जि. अमरावती येथून विमानाने सायंकाळी 5.30 वा. श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं.5.35 वा. मोटारीने उदगीरकडे प्रयाण. उदयगिरी औद्योगिक वसाहत लोणी नांदेड रोड उदगीर जिल्हा लातूर येथून रात्री 11.25 वा. श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. रात्री 11.30 वा. विमानाने आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणेकडे प्रयाण करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis