
बीड, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड शहर आणि जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
बीड जिल्ह्यातून सन २०२६साठी हज यात्रेकरिता जाणाऱ्या भाविकांनी कवर नंबर व मोबाईल नंबरची नोंदणी बीड जिल्हा हज कमिटीकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातून सन २०२६ साठी हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांकरिता हज कॅम्प सारख्या नशिस्तीसाठी माहिती देणारे मुफ्ती मोहम्मद आरीफ व मौलाना आबेद , मौलाना शकील व ट्रेनर कमिटीचे जबाबदार मार्गदर्शन करतील. त्यासाठी कवर नंबर व मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
त्यासाठी बीड जिल्हा हज कमिटीचे जमील जे.के. बार्शी नाका बीड, मोहम्मद फरहान शहंशाह नगर, मोहम्मद शाफे, शाफे मेडिकल बलभीम चौक, मोहम्मद निजाम जुना बाजार बीड येथे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis