
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाड्याच्या 7 जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवार पहाटेपर्यंत चालू होता. या पावसाने छत्रपती संभाजीनगर सह लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्याला पूर्णपणे झोडपून काढले आहे. शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकट घोंगावले आहे. हवामान खात्याने राज्यात 30 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आणखी संकट वाढण्याची शक्यता आहे.
मोंथा चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यातही झाला असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगरसह ७ जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. राज्यात गुरुवार, ३० ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात मंग जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यात पाऊस झाला. जालना जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. याचा फटका फळबागांसह भाजीपाला, कपाशीला बसला आहे.
वातावरणातील बदलाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे.
वातावरणातील बदलाच्या परिणामाचा फटका सगळ्यात जास्त मराठवाड्याला बसला आहे आणि त्यातही महाराष्ट्रात सगळ्यात कमी वनक्षेत्र असलेल्या लातूरला आणि धाराशिव जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात बसला आहे.
सर्वसाधारण 800 अब्ज मेट्रीक टन अतिरिक्त कार्बन हवेमध्ये पसरले गेले आहे. त्यामुळे सर्वसाधारण तापमानापेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त सध्याचे तापमान वाढले गेले आहे.
त्याचा परिणाम म्हणून भारताच्या तिन्ही बाजू कडील समुद्र तापला गेला आहे. पण समुद्रामध्ये तापमान वाढीमुळे होणारा परिणाम आणि त्यामुळे पडणारा अवेळी अनियंत्रित पाऊस याचा परिणाम यावर्षी प्रकर्षाने अनुभवला मिळाला.
या तापमान वाढीमुळे वातावरणातील बदल मोठ्या प्रमाणात जाणू लागला आहे. कधीही कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. आता काकीनाडा परिसरात आलेल्या मोंथा या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मराठवाड्यात पाऊस पडतोय. वातावरण बदलाचे परिणाम या भागात प्रचंड जाणवत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis