
बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उद्या दिनांक ३० ऑक्टोंबर २०२५ सकाळी ११ वाजता त्रिमूर्ती मंगल कार्यालय,वडवणी येथे कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने वडवणी येथे उद्या गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार प्रकाश साळुंखे यांनी दिली आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वडवणी तालुक्यातील भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये फारसे सख्य दिसत नाही यामुळेच वेगवेगळ्या बैठका घेतल्या जात आहेत असे दिसते.
वडवणी तालुक्यातील जिल्हापरिषद गट २ व पंचायत समिती गण ४ या गट,गणातील सर्व आजी माजी सरपंच,चेअरमन,कार्यकर्ते,पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis