रत्नागिरीत 31 ऑक्टोबरला त्रिभाषा धोरण निश्चिती समिती
रत्नागिरी, 29 ऑक्टोबर, (हिं. स.) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० च्या अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती येत्या 31 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत
रत्नागिरीत 31 ऑक्टोबरला त्रिभाषा धोरण निश्चिती समिती


रत्नागिरी, 29 ऑक्टोबर, (हिं. स.) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० च्या अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती येत्या 31 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत मान्यवरांशी संवाद साधण्याकरिता व त्यांची याबाबत मते जाणून घेण्याकरिता समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल व मुख्य कार्यकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

नागरिकांकरिता आपली मते/विचार व्यक्त करण्याची सुविधा समितीच्या https://tribhashasamiti.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्रिभाषा धोरण निश्चिती समितीचे सदस्य असे - अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, भाषा विज्ञान प्रमुख (डेक्कन कॉलेज) सोनल कुलकर्णी जोशी, शिक्षणतज्ज्ञ (छत्रपती संभाजीनगर) डॉ. मधुश्री सावजी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा, मुंबई संजय यादव.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande