रत्नागिरीत शुक्रवारी एकता दौड
रत्नागिरी, 29 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी पोलीस दलामार्फत भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त येत्या शुक्रवारी, दि. 31 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
एकता दौड


रत्नागिरी, 29 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी पोलीस दलामार्फत भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त येत्या शुक्रवारी, दि. 31 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत एकता दौड आयोजित करण्यात आली आहे.

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करणे तसेच राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य व सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या दौडीचा उद्देश आहे. ही एकता दौड ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता रत्नागिरीच्या पोलीस संचलन मैदानावर सुरू होईल. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते दौडीचा प्रारंभ होणार असून या दौडीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या दौडीचा मार्ग असा - आहे पोलीस संचलन मैदान, रोड चौक, जयस्तंभ, भाट्ये पूल, भाट्ये समुद्र किनारा आणि परत.

या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी, होमगार्ड्स, विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दौडीदरम्यान वैद्यकीय सहाय्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन राष्ट्रीय ऐक्य, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दृढ करावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande