शेतकरी हताश, भातपीक पाण्यात; मंत्री गोगावलेंचा नुकसानग्रस्त शेतीचा दौरा
रायगड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक तालुक्यांतील भातपिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक हातातून गेले असून त्यांच्यावर आर्थिक संकट क
शेतकरी हताश, भातपीक पाण्यात; मंत्री गोगावले यांचा नुकसानग्रस्त शेतीचा दौरा


रायगड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक तालुक्यांतील भातपिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक हातातून गेले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

या पार्श्वभूमीवर रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आज जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री गोगावले यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “नुकसानग्रस्त भातशेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी” असे स्पष्ट निर्देश दिले.

सध्या अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे भातपीक कापणी अडथळ्यात आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे परिश्रम वाया जात असल्याने अनेक ठिकाणी हताशा दिसून येत आहे.मंत्री गोगावले यांनी आश्वासन दिले की शासनस्तरावर नुकसानभरपाईसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. “शेतकऱ्यांना योग्य व तत्काळ मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांची नजर आता शासनाच्या मदतीकडे लागली असून, वेळेत आर्थिक सहाय्य मिळाल्यास त्यांना या संकटातून सावरणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande