मध्यप्रदेशमधून नाशिकमध्ये आलेल्या दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त
नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। मालेगावमध्ये दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. या प्रकरणात मध्यप्रदेश मधून आलेल्या दोघांना मालेगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आल्याची माहि
मध्यप्रदेश मधून नासिक मध्ये आले दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा


नाशिक, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। मालेगावमध्ये दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. या प्रकरणात मध्यप्रदेश मधून आलेल्या दोघांना मालेगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

या सर्व प्रकरणाबाबत माहिती देताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, 29 तारखेला रात्री म्हणजे बुधवारी रात्री मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या येवन सागर या हॉटेलच्या परिसरामध्ये दोन नागरिक संस्थांच्या फिरत असताना. मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाला आढळून आले. त्यानंतर या दोन्ही नागरिकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या बँकेमध्ये पाचशे रुपयांच्या 2000 नोटा सापडल्या त्याची किंमत सुमारे दहा लाख रुपये आहे. या नोटांची तपासणी केली असता. या नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर या नागरिकांची अधिक चौकशी केली असता ते मध्य प्रदेश मधील बराणपुर येथील असून वजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी ही बनावट रक्कम नाशिक मालेगाव मध्ये एका व्यक्तीला देण्यासाठी आणली असल्याचे सांगत आहेत. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे दरम्यान या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये नाशिक किंवा मालेगाव मध्ये ही रक्कम कोणाकडे जाणार होती. याबाबतचा तपास आता पोलिसांनी सुरू केला असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande