रायगड : अट्टल गुन्हेगार शाहनवाज कुरेशीसह तिघे गजाआड
रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) उत्तर प्रदेशात धडक कारवाई करत भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. आलिशान होंडा सिटी कारमधून रेकी करून उच्चभ्रू सोसायट्यांमधील बंद घरांचे कुलूप तोडून
उत्तर प्रदेशातून रायगड पोलिसांचा शिकार! अट्टल गुन्हेगार शाहनवाज कुरेशीसह तिघे गजाआड


रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) उत्तर प्रदेशात धडक कारवाई करत भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. आलिशान होंडा सिटी कारमधून रेकी करून उच्चभ्रू सोसायट्यांमधील बंद घरांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ₹१५ लाख ५० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ही टोळी रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील १० घरफोड्यांसाठी जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. गुन्हा रजि. नं. ७४/२०२५ अन्वये पाली पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपी एका जिल्ह्यात गुन्हा करून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याचे आढळले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी सलग एक महिना सिकंदराबाद (उत्तर प्रदेश) येथे वेषांतर करून आरोपींचा माग काढला.

मुख्य सूत्रधार शाहनवाज इकराम कुरेशी (वय ५०) हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचे दोन, खुनाच्या प्रयत्नाचे चार आणि शस्त्र कायद्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो अटक झाल्यावर आजारी असल्याचे नाटक करून पोलिसांना रिकव्हरीपासून वाचवायचा प्रयत्न करत असे. मात्र, रायगड पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अखेर आरोपींकडून ₹१५.५ लाखांचे सुवर्णालंकार जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सपोनि भास्कर जाधव, मानसिंग पाटील, तसेच रायगड LCBचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. रायगड पोलिसांनी नागरिकांना गुन्हेगारीविरुद्ध सक्रिय सहभागी होण्यासाठी ‘रायगड दृष्टी’ हा व्हॉट्सअॅप चॅटबॉटही सुरू केला असून, या माध्यमातून नागरिक गोपनीयपणे तक्रारी नोंदवू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande