गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरी ; लाखो रुपयांची रोकड लंपास
जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केली आहे. चोरट्यांनी कॉलेज परिसरात प्रवेश करून थेट कॅशियर ऑफिसचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. कार्यालयातील अ
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरी ; लाखो रुपयांची रोकड लंपास


जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केली आहे. चोरट्यांनी कॉलेज परिसरात प्रवेश करून थेट कॅशियर ऑफिसचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. कार्यालयातील अंदाजे १० ते ११ लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची माहिती समोर आलीय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांच्या जळगावातील बंगल्यात चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. आता जळगाव-भुसावळ रोडवरील गोदावरी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये मोठी चोरी झाली. दिवाळीनिमित्त सुट्ट्यांमुळे कॉलेजमधील काही कार्यालये बंद होती. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री संस्थेत प्रवेश केला. आज शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही चोरी उघडकीस आली. चोरट्यांनी आस्थापना विभागातील चार कॅबिन्सचे कपाटे फोडली आणि त्यामध्ये ठेवलेली सुमारे १० ते ११ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही रोकड महाविद्यालयातील मुलींच्या मेसचे (भोजनगृह) जमा झालेले शुल्क होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. चोरट्यांनी प्रवेश कसा केला आणि कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच फिंगरप्रिंट एक्स्पर्ट्सनाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande