
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
केज-धारूर महामार्गालगत असलेल्या भवानीनगर परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर केज पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
या कारवाईत दलालाला पकडण्यात आले असून, धाराशिव जिल्ह्यातील एका पीडित महिलेची सुटका केली आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केजयेथील भवानीमाळ, धारूर रोडवरील राहत्या घरात महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय चालवत आहे.
त्यानुसार एक पथक तयार केले. दोन पंच आणि एक डमी ग्राहक सोबत घेऊन पोलिसांनी सापळा रचला. डमी ग्राहकाने इशारा देताच, पोलिसांनी छापा टाकला.
छापा टाकल्यावर आरोपीस जेरबंद करण्यात आले.
त्याच्याकडून डमी ग्राहकाने दिलेली १,२०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. तपासणीदरम्यान वरच्या मजल्यावरील खोलीत एक पीडित महिला आणि डमी ग्राहक मिळाले.
पीडित महिलेने सांगितले की, ती मूळ धाराशिव जिल्ह्यातील असून, आरोपी तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होता. आरोपी प्रत्येक ग्राहकाकडून १,५०० रुपये घेत होता. त्यातील केवळ ७०० रुपये महिलेला तर ५०० रुपये आरोपी स्वतः घेत होता. या प्रकरणी आरोपी विरुध्द अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याच्या कलमान्वये केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis