जनावरे खरेदी-विक्रीचा वाद : धारणीत व्यापाऱ्याची हत्या, एक गंभीर जखमी
अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। धारणी येथील दाना मार्केटमध्ये रविवारी रात्री ९ .३० वाजता ८ ते १० अनोळखी हल्लेखोरांनी दोन सख्या भावांबर घातक शस्त्राने हल्ला केला. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे धारणी गावात तणाव
जनावरे खरेदी-विक्रीचा वाद : धारणीत व्यापाऱ्याची हत्या, एक गंभीर जखमी


अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

धारणी येथील दाना मार्केटमध्ये रविवारी रात्री ९ .३० वाजता ८ ते १० अनोळखी हल्लेखोरांनी दोन सख्या भावांबर घातक शस्त्राने हल्ला केला. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे धारणी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अकोट तालुक्यातील हिवरखेड येथील फाजील अकील बेग (४५) असे मृताचे नाव आहे. तर नाझिम अकील बेग (४०) असे जखमीचे नाव आहे.

फाजील व त्याचा भाऊ नाझिम हे दोघेही जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तसेच जनावरे खरेदी-विक्रीकरिता जिल्ह्यातील वेगवेगळ्या बैल बाजारात जातात. शनिवारी धारणी येथील बैलबाजार असल्यामुळे दोघेही भाऊ बाजारात आले होते. शनिवारी बैल बाजारझाल्यानंतर काही कामाने दोघेही धारणीतच मुक्कामी होते. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोघे भाऊ दाना मार्केट येथे उभे असताना अचानक ८ ते १० हल्लेखोर आले आणि दोन भावांवर चाकू, तलवारीने सपासप करून पसार झाले.या हल्ल्यात फाजीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लहान भाऊ नाझिम हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच पोलिसांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना शांत करीत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. तसेच जखमीला सरकारी रुग्णालयात दाखल करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. परंतु याघटनेमुळे धारणी गावात चांगलीच खळबळ उडाली असून हत्या कोणी व का केली याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande