मोटोरोलाने मोटो जी06 पॉवर बजेट स्मार्टफोन केला लॉन्च
मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। मोटोरोला कंपनीने भारतात आपला नवा बजेट 4जी स्मार्टफोन मोटो जी06 पॉवर सादर केला आहे. कंपनीच्या लोकप्रिय मोटो जी सीरिज अंतर्गत हा नवा फोन आणण्यात आला असून, त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील ७,०००mAh क्षमतेची जबरदस्त
Moto G06 Power


मुंबई, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। मोटोरोला कंपनीने भारतात आपला नवा बजेट 4जी स्मार्टफोन मोटो जी06 पॉवर सादर केला आहे. कंपनीच्या लोकप्रिय मोटो जी सीरिज अंतर्गत हा नवा फोन आणण्यात आला असून, त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यातील ७,०००mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी आणि मीडियाटेक हेलिओ जी८१ एक्स्ट्रीम प्रोसेसर. या नव्या डिव्हाइसला किफायतशीर किंमत, आकर्षक डिझाइन आणि शक्तिशाली परफॉर्मन्स यांचे उत्तम संयोजन म्हणून पाहिले जात आहे.

भारतीय बाजारात मोटो जी06 पॉवरच्या बेस व्हेरिएंटची किंमत फक्त ७,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या व्हेरिएंटमध्ये ४GB RAM आणि ६४GB इंटरनल स्टोरेज मिळते. कंपनीने हा फोन पँटोन लॉरेल ओक, पँटोन टेंड्रिल आणि पँटोन टेपेस्ट्री या तीन रंगांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांना हा ११ ऑक्टोबरपासून डिव्हाइस फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया वेबसाइट तसेच देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल.

या फोनमध्ये ६.८८-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना किंवा गेम खेळताना स्क्रीन अधिक स्मूथ अनुभव देते. याशिवाय डिस्प्लेची पीक ब्राइटनेस ६०० निट्स असून, त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३चे प्रोटेक्शन दिले आहे. त्यामुळे फोनच्या स्क्रीनला स्क्रॅच आणि लहान धक्क्यांपासून चांगले संरक्षण मिळते.

परफॉर्मन्सच्या दृष्टीने पाहता Moto G06 Power मध्ये दिलेला मीडियाटेक हेलिओ जी८१ एक्स्ट्रीम प्रोसेसर हा मिड-रेंज सेगमेंटमधील सक्षम चिपसेट मानला जातो. यामुळे फोन मल्टीटास्किंग, गेमिंग आणि रोजच्या वापरात सहजपणे काम करतो. फोनमध्ये ४GB RAM आणि ६४GB स्टोरेज आहे, तसेच microSD कार्डच्या माध्यमातून १TB पर्यंत मेमरी वाढवता येते, ही गोष्ट बजेट सेगमेंटमध्ये खास मानली जाते.

फोटोग्राफीच्या दृष्टीने या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा f/1.8 अपर्चर आहे. या कॅमेऱ्याद्वारे कमी प्रकाशातसुद्धा चांगल्या दर्जाचे फोटो घेता येतात. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, त्याचा f/2.0 अपर्चर आहे. याशिवाय फोनमध्ये Google Gemini AI असिस्टंटचा सपोर्टही दिला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट आणि सोपी डिजिटल मदत मिळते.

कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 6.0, GPS, Glonass, Galileo, QZSS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. या सर्व सुविधांमुळे फोन आधुनिक नेटवर्किंग गरजांसाठी पूर्णतः सक्षम ठरतो.

फोनमध्ये ७,०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ वापरासाठी पुरेशी आहे. कंपनीने या फोनमध्ये १८W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे, ज्यामुळे फोन कमी वेळात चार्ज होतो आणि जास्त वेळ चालतो. तसेच या फोनला IP64 रेटिंग मिळाली आहे, म्हणजेच तो धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून सुरक्षित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande