परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने आयोजित शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत बाल विद्यामंदिर हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर संघाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
१७ वर्ष वयोगटातील विजयी संघात शिवनंदन मनोहर पुरी, तनिष्कराज संजय प्रधान, अनुज आशिष कवठेकर, शौर्य सुनील घुमरे, योगेश राम घुले या विद्यार्थ्याचा समावेश होता. त्याचबरोबर १९ वर्ष वयोगटात स्मित रोशन करेवार आणि अक्षज आशिष कवठेकर या दोन खेळाडूंचीही राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विजयानंतर खेळाडूंसह क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर पंडित, संतोष देशमुख व प्रभाकर गमे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर, सचिव डॉ. विवेक नावंदर, संचालक मंडळ, तसेच मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार, पर्यवेक्षक प्रदीप रुघे, बळीराम कोपरटकर आणि सौ. सीमा बोके यांनी केले. सर्वांनी संघाला आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis