भारतासोबत थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणे हे एक सकारात्मक पाऊल - चीन परराष्ट्र मंत्रालय
बीजिंग , 9 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत सध्या दिसून येत आहेत. त्यातील एक म्हणजे भारत आणि चीन दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणे. जवळपास पाच वर्षांच्या अंतरानंतर, 26 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांद
भारतासोबत थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणे हे एक सकारात्मक पाऊल - चीन परराष्ट्र मंत्रालय


बीजिंग , 9 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत सध्या दिसून येत आहेत. त्यातील एक म्हणजे भारत आणि चीन दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणे. जवळपास पाच वर्षांच्या अंतरानंतर, 26 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाण पुन्हा सुरू होणार आहे. गुरुवारी (9 ऑक्टोबर) चीनने भारतासोबत थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणे हा एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. तसेच, चीनने असेही सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या सहमतीवर दोन्ही देश प्रामाणिकपणे काम करत आहेत.

चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी आठ दिवसांच्या राष्ट्रीय सुट्टीनंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “उड्डाणे ऑक्टोबर अखेरपर्यंत पुन्हा सुरू होतील.” भारत सरकारने 2 ऑक्टोबरला घोषणा केली होती की भारत आणि चीन यांच्यातील थेट विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू केली जाईल. माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात गुओ जियाकुन म्हणाले, “हा नवीन निर्णय दर्शवतो की दोन्ही देश 31 ऑगस्ट रोजी तियानजिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सहमतीवर प्रामाणिकपणे काम करत आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “हा एक सक्रिय आणि सकारात्मक निर्णय आहे, जो भारत आणि चीनच्या 2.8 अब्ज लोकांमध्ये मैत्रीपूर्ण देवाणघेवाण सुलभ करतो.”दरम्यान, एससीओ शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि जिनपिंग यांची तियानजिनमध्ये भेट झाली होती. त्यांनी 2024 मध्ये कझान, रशिया येथे झालेल्या शेवटच्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या सकारात्मक प्रगतीचे स्वागत केले होते.

गुओ यांनी पुढे स्पष्ट केले की, “चीन भारतासोबतच्या संबंधांकडे रणनीतिक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्यास तयार आहे. आम्हाला चांगले शेजारी, मित्र आणि एकमेकांच्या यशात भागीदार व्हायचे आहे. ड्रॅगन आणि हत्ती यांच्यातील सहकार्य यशस्वी करून, दोन्ही देशांच्या लोकांना ठोस लाभ मिळवून द्यायचा आहे आणि आशियातील व जागतिक शांततेत योगदान द्यायचे आहे.”

सध्या एअर चायना सारख्या काही चीनी एअरलाइन कंपन्यांनी अधिकृतपणे उड्डाण पुन्हा सुरू करण्याची घोषणा केलेली नाही. मात्र, भारतीय एअरलाइन इंडिगो आणि चायना ईस्टर्न या दोन कंपन्या थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणाऱ्या पहिल्या कंपन्या असतील, असे सांगितले जात आहे. इंडिगोने अलीकडेच एक निवेदनात म्हटले आहे की, ती 26 ऑक्टोबरपासून कोलकाता ते ग्वांगझू दरम्यान दररोज थेट उड्डाण सुरू करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande