जर कोणी पुन्हा पाकिस्तानसोबत युद्ध केले, तर त्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल- आसिम मुनीर
इस्लामाबाद , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा खोटे दावे आणि पाकिस्तानी सेनेची खोटी स्तुती करत भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला.मुनीर म्हणाले की पाकिस्तानी सेना “अल्लाहची फौज” आहे आणि “जेव्हा
जर कोणी पुन्हा पाकिस्तानसोबत युद्ध केले, तर त्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल- आसिम मुनीर


इस्लामाबाद , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा खोटे दावे आणि पाकिस्तानी सेनेची खोटी स्तुती करत भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला.मुनीर म्हणाले की पाकिस्तानी सेना “अल्लाहची फौज” आहे आणि “जेव्हा मुसलमान अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीदेखील क्षेपणास्त्रात बदलते.” त्यांनी धमकी देत सांगितले की “जर पुन्हा पाकिस्तानवर युद्ध लादले गेले, तर कडक प्रत्युत्तर दिले जाईल.”

अहवालानुसार, जॉर्डनच्या राजा अब्दुल्ला द्वितीय यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या लंचदरम्यान मुनीर यांनी भारतासोबत मे महिन्यात झालेल्या चार दिवसीय संघर्षाचा उल्लेख केला. त्यांनी पुन्हा एकदा 7 ते 10 मेदरम्यान भारतावर “विजय” मिळवल्याचा खोटा दावा केला आणि म्हटले की पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्यांना “मजबूतीने तोंड दिले”.

मुनीर म्हणाले, “भारतासोबतच्या युद्धात अल्लाहने आमचे मस्तक उंच ठेवले. जेव्हा मुसलमान अल्लाहवर अवलंबून असतो, तेव्हा शत्रूवर टाकलेली मातीसुद्धा मिसाइल बनते.”ते पुढे म्हणाले, “आम्ही अल्लाहच्या आदेशाप्रमाणे आमची कर्तव्ये पार पाडतो. अल्लाहच्या मदतीनेच पाकिस्तानने शत्रूला तोंड दिले. पाकिस्तानी सेना ही अल्लाहची सेना आहे आणि आमचे सैनिक त्याच्या नावावर लढतात.”

याशिवाय आसिम मुनीर यांनी जॉर्डनसोबतचे संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याचे आश्वासनही दिले. त्यांनी लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी आणि शांततापूर्ण प्रदेशाचे सामाईक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानकडून सर्व उपाय केले जातील, असे सांगितले. जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय हे आपल्या प्रतिनिधिमंडळासह दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande