पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणावरील सीआयएचा अहवाल खोटा - ट्रम्प
वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सऊदी क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांचे उघडपणे समर्थन केले.2018 मध्ये पत्रकार जमाल खशोगी यांच्या निर्घृण हत्येबद्दल प्रश्न विचारताच ट्रम्प भडकले आणि रिपोर
ट्रम्प यांनी खाशोगी हत्या प्रकरणावरील सीआयएचा अहवाल खोटा असल्याचे सांगितले


वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सऊदी क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांचे उघडपणे समर्थन केले.2018 मध्ये पत्रकार जमाल खशोगी यांच्या निर्घृण हत्येबद्दल प्रश्न विचारताच ट्रम्प भडकले आणि रिपोर्टरला सुनावत म्हणाले की क्राउन प्रिंसला या हत्येबद्दल ‘काहीच माहिती नव्हती’.

प्रिन्सच्या अमेरिकेतील पहिल्या दौऱ्याच्या वेळी ओवल ऑफिसमध्येच ट्रम्प यांनी खशोगी प्रकरण पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न केला.ट्रम्प म्हणाले की खशोगी ‘अत्यंत वादग्रस्त व्यक्ती’ होते आणि पुढे म्हणाले, “त्या व्यक्तीला बरेच लोक पसंत करत नव्हते. तुम्हाला ते आवडो वा न आवडो, काही गोष्टी घडतातच.” त्यांनी रिपोर्टरला सुनावत सांगितले की पाहुण्याला लाजिरवाण्या परिस्थितीत टाकण्याची गरज नाही.

सऊदी क्राउन प्रिन्स यांनी खशोगी यांच्या हत्येला ‘दुःखद’ आणि ‘मोठी चूक’ असे म्हटले आहे. त्यांनी ते एक वेदनादायी प्रकरण असल्याचे सांगितले, परंतु ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा ठामपणे सांगितले की प्रिन्सला याबद्दल काहीही माहिती नव्हती. सऊदी सरकारनेही ही हत्या ‘बेकाबू एजंटांची कारस्थान’ असल्याचे म्हटले आहे. मात्र 2021 मधील अमेरिकन गुप्तचर अहवालात स्पष्ट नमूद होते की खशोगी यांना पकडण्याचा किंवा मारण्याचा आदेश स्वतः क्राउन प्रिन्स मोहम्मद यांनी दिला होता.ट्रम्प यांनी हा अहवाल संपूर्णपणे दुर्लक्षित केला.

जमाल खशोगी यांच्या विधवा हनान इलात्र खशोगी यांनी म्हटले की त्यांच्या पतीच्या हत्येला कोणताही आधार असू शकत नाही. त्यांनी सऊदी प्रिन्सने भेट घेऊन माफी मागावी आणि भरपाई द्यावी, अशी मागणी केली. मात्र व्हाइट हाऊसमधील बैठकीत या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande