रत्नागिरी जिल्ह्यात पालिकांसाठी एकूण ६१३ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. थेट नगराध्यक्षपद आणि सदस्यपदांसाठी एकूण ६१३ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत
रत्नागिरी जिल्ह्यात पालिकांसाठी एकूण ६१३ उमेदवार रिंगणात


रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. थेट नगराध्यक्षपद आणि सदस्यपदांसाठी एकूण ६१३ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत.

येत्या दोन डिसेंबर रोजी होणार असलेल्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर माघारीची मुदत काल २१ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार नगरपालिका तसेच लांजा, देवरूख आणि गुहागर अशा तीन नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. माघारीच्या दिवशी थेट नगराध्यक्ष आणि सदस्यपदाच्या एकूण ७८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

त्याची पालिकानिहाय आकडेवारी अशी - (कंसातील आकडे उमेदवारी दाखल केलेल्या अर्जांचे) रत्नागिरी - अध्यक्ष शून्य (७), सदस्य 15 एकूण 15 (१३२). चिपळूण - अध्यक्ष शून्य (१३),सदस्य नऊ 89 (१४१), खेड - अध्यक्ष दोन (८) सदस्य 16 एकूण 18 (८२). राजापूर - अध्यक्ष शून्य (५) सदस्य सात एकूण ७ (६५). लांजा - अध्यक्ष एक (७), सदस्य आठ एकूण नऊ (५६). देवरूख -अध्यक्ष दोन (९), दस्य सात एकूण नऊ (७९). गुहागर अध्यक्ष एक (७), सदस्य 10 एकूण 11 (८०).

सातही स्थानिक स्वराज्य संस्था मिळून अध्यक्षपदाच्या ५६ पैकी सहा आणि सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६३५ पैकी ७२ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी ५० आणि सदस्यपदांसाठी जिल्ह्यात एकूण ५६३ असे ६९१ पैकी ६१३ उमेदवार रिंगणात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande