
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : गुहागर नगरपंचायतीमध्ये पहिल्या नगरसेविका बिनविरोध निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष मावळंकर या प्रभाग क्रमांक पाचमधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
या प्रभागात फक्त दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुरस्कृत सिद्धी राजेश शेटे आणि भाजपच्या वैशाली मावळंकर अशी ही लढत होती, मात्र मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या काही मिनिटे आधीच सिद्धी शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परिणामी वैशाली मावळंकर बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या. या घडामोडीनंतर भाजप आणि युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी