रत्नागिरी : दापोलीत किमान तापमान ८.५ अंशांवर
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : गेल्या चार-पाच दिवसांपासून दापोलीत थंडीने चांगलाच जोर धरला असून तापमानाचा पारा ८.५ अंशांवर घसरला आहे. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात माचाळ (ता. लांजा) आणि दापोली ही ठिकाणे थं
रत्नागिरी : दापोलीत किमान तापमान ८.५ अंशांवर


रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : गेल्या चार-पाच दिवसांपासून दापोलीत थंडीने चांगलाच जोर धरला असून तापमानाचा पारा ८.५ अंशांवर घसरला आहे.

अवकाळी पाऊस थांबल्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात माचाळ (ता. लांजा) आणि दापोली ही ठिकाणे थंड हवेची म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापैकी यावर्षी अजून तरी दापोलीत सर्वाधिक थंडी जाणवू लागली आहे.

हवामान विभागाच्या सूचनेनुसार आगामी काही दिवस सकाळी व रात्री थंडी कायम राहणार असून लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande