आयएमए महास्‍पोर्टस्‌मध्ये क्रीडा स्‍पर्धांतील विजेत्‍यांचा पारितोषिकाने गौरव
नाशिक, 4 नोव्हेंबर (हिं.स.) - गेल्‍या तीन दिवसांपासून अतिशय उत्‍साहपूर्ण वातावरणात सुरु असलेल्‍या आयएमए महास्‍पोर्टस्‌ २०२५ या क्रीडा महोत्‍सवाचा समारोप झाला. क्रिकेटच्‍या अंतिम सामन्‍यावर पावसाने पाणी फेरल्‍याने छत्रपती संभाजीनगरचे सीएसएन स्‍पार्ट
छत्रपती संभाजीनगर, नाशिक संघ संयुक्‍त विजेते आयएमए महास्‍पोर्टस्‌मध्ये क्रीडा स्‍पर्धांतील विजेत्‍यांचा पारितोषिकाने गौरव


नाशिक, 4 नोव्हेंबर (हिं.स.) - गेल्‍या तीन दिवसांपासून अतिशय उत्‍साहपूर्ण वातावरणात सुरु असलेल्‍या आयएमए महास्‍पोर्टस्‌ २०२५ या क्रीडा महोत्‍सवाचा समारोप झाला. क्रिकेटच्‍या अंतिम सामन्‍यावर पावसाने पाणी फेरल्‍याने छत्रपती संभाजीनगरचे सीएसएन स्‍पार्टन्‍स आणि नाशिक मास्‍टर ब्‍लास्‍टर या संघांनी संयुक्‍त विजेते घोषित केले. इतरही खेळांतील विजेत्‍या खेळाडूंचा पारितोषिकाने गौरव करण्यात आला.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेच्‍या वतीने आयएमए महास्‍पोर्टस्‌ २०२५ चे यशस्‍वी आयोजन करण्यात आले. या महोत्‍सवाअंतर्गत क्रीडा स्‍पर्धांना शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) सुरुवात केली होती. स्‍पर्धेतील क्रिकेटचे सामने शहरातील ३ मैदानांवर खेळविले जात होते. रविवारी या स्‍पर्धेतील उपांत्‍य व अंतिम फेरीचे सामने झाले. उपांत्‍य फेरीच्‍या पहिल्‍या सामन्‍यात आयएमए अमरावती सुपरजायंट्‌स संघाने १० षटकांमध्ये ७ बाद ७६ धावा केल्‍या. अटीतटीच्‍या झालेल्‍या या सामन्‍यात प्रतिस्‍पर्धी छत्रपती संभाजीनगर येथील सीएसन स्‍पाटन्‍स संघाने ९.५ षटकात ४ बाद ७७ धावा करताना ६ गडी राखून सामना जिंकला. व अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दुसर्या उपांत्‍य फेरीच्‍या सामन्‍यात नाशिक मास्‍टर ब्‍लास्‍टर संघाने १० षटकांमध्ये ३ बाद ९६ धावा केल्‍या. उत्तरादाखल रॉयल चॅलेंजर्स परभणी संघाला १० षटकांमध्ये ८ बाद ८३ धावा करता आल्‍या. यातून नाशिक संघाने १३ धावांनी सामना जिंकला. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक संघामध्ये अंतिम लढत झाली. छत्रपती संभाजीनगर संघाने ८ षटकात ६ बाद ४७ धावा केल्‍या. तर नाशिक संघाने १ षटकात ५ धावा केलेल्‍या असताना, मैदानातील ओलाव्‍यामुळे सामना रद्द करण्यात आला. व दोन्‍ही संघांना संयुक्‍त विजेते घोषित करण्यात आले.

क्रीडक मैदानावर क्रिकेट स्‍पर्धेसह इतर विविध क्रीडा स्‍पर्धांतील विजेते स्‍पर्धक डॉक्‍टरांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयएमए नाशिकचे माजी अध्यक्ष डॉ.शिरीष देशपांडे यांच्‍या हस्‍ते विजेत्‍यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.नीलेश निकम, सचिव डॉ.मनिषा जगताप, महास्‍पोर्टस्‌ स्‍पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन चिताळकर, डॉ.अनिरुद्ध भांडारकर, सहअध्यक्ष डॉ.कपिल पाळेकर, डॉ.सचिन आहेर, डॉ.सागर दुकळे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

आयएमए महास्‍पोर्टस्‌अंतर्गत विविध क्रीडा स्‍पर्धा घेण्यात आल्‍या. यामध्ये क्रिकेटसह पोहणे, लॉन टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, मॅरेथॉन, कॅरम, चेस, टेबल टेनिस यासह मैदानी स्‍पर्धांचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande