आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड विभाग सज्ज
रायगड, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) रायगड विभागाच्या क्रिकेट संघाच्या निवडीसाठी पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाच्या मैदानावर मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे
“आंतरजिल्हा स्पर्धेसाठी रायगड विभागाचा क्रिकेट संघ तयार करण्यास सुरुवात”


रायगड, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) रायगड विभागाच्या क्रिकेट संघाच्या निवडीसाठी पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाच्या मैदानावर मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन रायगड विभागाचे विभाग नियंत्रक सुहास चौरे यांच्या हस्ते उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.

या प्रसंगी परिवहन महामंडळ रायगड विभागाचे कामगार अधिकारी सुहास कांबळे, विभागीय कार्यशाळेचे प्रभारक रविंद्र तांडेल, पेण कार्यालयाचे लिपिक रुपेश चांदोरकर, वाहन परीक्षक दिलीप पालवणकर, झुंझार युवक मंडळ पोयनाडचे सचिव किशोर तावडे, क्रीडा प्रमुख नंदकिशोर चवरकर, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य ॲड. पंकज पंडित तसेच संघ सिलेक्टर अभिषेक खातू आणि प्रितम पाटील उपस्थित होते.

रायगड विभागातील सुमारे ४० खेळाडूंनी या निवड चाचणी शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरातून रायगड विभागाचा क्रिकेट संघ निवडण्यात येणार असून निवड झालेला संघ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत, जळगाव येथे १८ नोव्हेंबरपासून सहभागी होणार आहे.

या निमित्ताने विभाग नियंत्रक सुहास चौरे, कामगार अधिकारी सुहास कांबळे, प्रभारक रविंद्र तांडेल, लिपिक रुपेश चांदोरकर, वाहन परीक्षक दिलीप पालवणकर यांच्यासह रायगड विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे रायगड विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये क्रीडाविषयक उत्साह वाढीस लागला असून, खेळाडूंमध्ये आंतरजिल्हा पातळीवर राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची उमेद वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande