
पाटणा, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।“मला याबद्दल अजिबात शंका नाही की बिहारमध्ये एनडीएला प्रचंड विजय मिळेल,” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचार मोहिमेच्या अखेरच्या दिवशी (मंगळवारी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “निवडणूक सभांमध्ये महिलांची विक्रमी उपस्थिती दिसत आहे. त्या उत्साहाने घोषणा देत आहेत.” मोदी पुढे म्हणाले की, “मला याबद्दल अजिबात शंका नाही की बिहारमध्ये एनडीएला प्रचंड विजय मिळेल.” पंतप्रधानांनी महिला कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदान सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. हा संवाद भारतीय जनता पक्षाच्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या उपक्रमाच्या अंतर्गत झाला.
यावेळी पंतप्रधान मोदींनी महिला कार्यकर्त्यांना हेही आवाहन केले की,“बिहारच्या निवडणुकीत ‘जंगलराज’च्या समर्थकांना आतापर्यंतची सर्वात मोठी पराभवाची चव चाखावी लागली पाहिजे.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, “एनडीए सरकार महिलांचे जीवन अधिक सुलभ बनवण्यासाठी आणि त्यांना सशक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode