छत्तीसगड : मालगाडीवर चढली पॅसेंजर ट्रेन; 6 जणांचा मृत्यू
बिलासपूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये आज, मंगळवारी एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. कोरबा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांची जोरदार टक्कर होऊन या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेच्या ठ
छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये  मालगाडीवर चढली पॅसेंजर ट्रेन


बिलासपूर, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये आज, मंगळवारी एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. कोरबा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांची जोरदार टक्कर होऊन या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले असून रिस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यासंदर्भातील माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे 4 वाजता घडली. रेल्वे प्रशासनाने सर्व साधनसामग्री आणि मदतपथक घटनास्थळी पाठवले आहे. जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे की, अपघातानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि रिस्क्यू मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातानंतर लगेचच मेडिकल युनिट आणि विभागीय अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. सध्या या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली असून, अनेक पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

रेल्वेने हेल्पलाईन क्रमांक जारी केले

बिलासपूर – 7777857335, 7869953330

चांपा – 8085956528

रायगड – 9752485600

पेंड्रारोड – 8294730162

कोरबा – 7869953330

प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक या क्रमांकांवर संपर्क साधून आवश्यक माहिती मिळवू शकतात. रेल्वे प्रशासनाने सर्वतोपरी मदत आणि समन्वय सुनिश्चित केला आहे.

रेल्वेचे अधिकृत निवेदन

रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिलासपूर स्टेशनजवळ दुपारी सुमारे 4 वाजता मेमू ट्रेनचा डबा मालगाडीला धडकला.जखमींच्या उपचारासाठी सर्व सुविधा आणि साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पुढील महत्त्वाची माहिती

इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्व रुग्णालये आणि डॉक्टरांना तत्काळ सेवेकरिता पाचारण केले आहे.

बिलासपूरमधील अनेक समाजसेवी संस्था घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट आणि मालगाडी गार्ड यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल आणि तोर्वा परिसरात रुग्णवाहिका आणि जखमींची सतत ये-जा सुरू आहे.

अपोलो हॉस्पिटलमध्येही मोठी गर्दी झाली आहे.

आरपीएफ आणि पोलिस दलाने घटनास्थळी नाकाबंदी केली आहे.

लोकल ट्रेनचा ड्रायव्हर विद्या सागर यांचा अद्याप काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.

मालगाडीचा गार्ड शैलेश चंद यादव यांनी उडी मारून आपले प्राण वाचवले.

लोकल ट्रेनचा गार्ड सुरक्षित आहे.

रेल्वेकडून नुकसानभरपाईची घोषणा

या अपघातानंतर रेल्वे मंत्री यांनी पीडितांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची भरपाई

गंभीर जखमी प्रवाशांना 5 लाख रुपयांची मदत

किरकोळ जखमींना 1 लाखांची आर्थिक मदत देणार आहे.-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande