भुसावळात घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास
जळगाव, 5 नोव्हेंबर (हिं.स.)भुसावळ ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे विभागात वरिष्ठ विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विकास सुमेरसिंग धुर्वे यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी धाड टा
भुसावळात घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास


जळगाव, 5 नोव्हेंबर (हिं.स.)भुसावळ ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनी परिसरात घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे विभागात वरिष्ठ विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विकास सुमेरसिंग धुर्वे यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत रोकड व सोन्या-चांदीचे दागिने मिळून ५० हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विकास धुर्वे हे ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनीत राहतात. ते गावी गेल्यानंतर २ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत त्यांच्या घरात कोणीही नव्हते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य गेट व कपाटाचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला आणि मौल्यवान ऐवजावर हात साफ केला. घरातून दोन सोन्याच्या अंगठ्या (६ ग्रॅम), चांदीच्या पायल (१०० ग्रॅम), पैजण (५० ग्रॅम) आणि २५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा माल चोरीस गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे पुढील तपास करत आहेत. या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांमध्ये चोरट्यांविषयी संताप व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande