
धुळे , 5 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील साक्री रोडवरील गवळीवाडा नदीकिनारी घरगुती गॅस वाहनात भरण्याचा अवैध धंदा चालू असतांना धुळे एलसीबी पथकाने छापा मारून कारवाई केली. यात इलेक्ट्रिक मोटर, गॅस सिलेंडर आदी साहित्य असा सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज सकाळी साडेसात वाजता ही कारवाई धुळे एलसीबीने केली आहे. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एलसीबी प्रमुख श्रीराम पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर