नांदेड - 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
नांदेड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर बुधवार 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 13 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीचा कार्यक्रम का
अ


नांदेड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर बुधवार 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 13 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीचा कार्यक्रम काल 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला असून या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद देगलूर, नगरपरिषद भोकर, नगर परिषद धर्माबाद, नगरपरिषद किनवट, नगरपरिषद उमरी, नगरपरिषद हदगांव, नगरपरिषद मुखेड, नगरपरिषद कंधार, नगरपरिषद बिलोली, नगरपरिषद कुंडलवाडी, नगरपरिषद मुदखेड, नगरपरिषद लोहा, नगरपंचायत हिमायतनगर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या क्षेत्रात 1 लाख 47 हजार 165 पुरुष तर 1 लाख 50 हजार 858 स्त्री व इतर 20 असे एकूण 2 लाख 98 हजार 40 मतदार आपल्या मतदानाचा हक्क 351 संभाव्य मतदान केंद्रावर बजावतील.

12 नगरपरिषदांमध्ये नगरपरिषद देगलूर ही ब वर्गवारीची असून बाकी सर्व क वर्गवारीच्या नगरपरिषद व #नगरपंचायत आहेत. या सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये एकूण प्रभाग संख्या 141 आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 रोजी 3 वाजेपर्यत राहील. या कालावधीत येणाऱ्या रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल.

मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande