शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री गुलाबराव पाटील भडकले
जळगाव, 5 नोव्हेंबर (हिं.स.) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. पण सरकारची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बै
शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री गुलाबराव पाटील भडकले


जळगाव, 5 नोव्हेंबर (हिं.स.) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. पण सरकारची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलेच भडकले. राज्य मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कोट्यवधी रुपये देखील मंजूर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत. मदत पोहोचविण्यात प्रशासनाला अपयश आले तर त्याची नाराजी आमच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून येते, अधिकाऱ्यांना कोणी विचारत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर अशा काहीच जिल्ह्यांमध्ये शासनाची मदत पोहोचविण्याचे काम समाधानकारक आहे, अन्यत्र तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे, या शब्दांत प्रशासनाचे कान टोचले. दरम्यान, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यात जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि निर्यात क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने आढावा बैठकपार पडली.

बैठकीत केळी पीकविमा मिळण्यासंबंधी प्रलंबित मुद्द्यांवर तसेच केळी निर्यात सुविधा केंद्रांची क्षमता आणि संख्या वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जळगाव जिल्हा हा राज्यातील केळी उत्पादनात अग्रस्थानी असून, शेतकऱ्यांच्या विमा दावे निकाली काढणे, निर्यात साखळी अधिक मजबूत करणे आणि जिल्ह्याला केळी निर्यात केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande