धाराशिव : नगराध्यक्षपदाच्या जागांवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट
जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा धाराशिव, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आपल
जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा


जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा

धाराशिव, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।

धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जिल्ह्यातील आठ नगर परिषदांपैकी किमान दोन जागा नगराध्यक्षपदासाठी मिळाव्यात, अशी मागणी दुधगावकर यांनी केली होती. मात्र, पक्ष या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे दुधगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दुधगावकर यांनी पक्षाकडे नगराध्यक्षपदाच्या जागांसाठी आग्रह धरला होता.

दुधगावकर यांनी केवळ जिल्हाध्यक्ष पदाचाच नव्हे, तर पक्षाच्या सक्रिय सदस्य आणि प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

एवढेच नाही, तर दुधगावकर यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणखी एक नेते संजय निंबाळकर यांनीही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षानेच जागावाटपाच्या मुद्द्यावरून पक्ष सोडल्यामुळे हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या दुहेरी राजीनाम्यांमुळे जिल्ह्यातील पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande