केंद्रीय पथकाचा बीड जिल्हा दौरा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात दाखल झाले. पथकात एसव्हीएसपी शर्मा , विशाल पांडे यांचा समावेश होता. पथकाने बीड, आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यांतील विव
पथकात एसव्हीएसपी शर्मा , विशाल पांडे यांचा समावेश


बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात दाखल झाले.

पथकात एसव्हीएसपी शर्मा , विशाल पांडे यांचा समावेश होता.

पथकाने बीड, आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यांतील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

लिंबा रुई, येवलवाडी, कारेगाव, घाटपिंपरी आणि देवळाली या गावांमध्ये शेती, फळबागा, रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि घरांचे मोठे नुकसान झाल्याचे पथकाने नोंदवले.

पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय पथकास जिल्ह्यातील एकूण नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनीही नुकसानीचा आढावा सादर केला.

नुकसानीचा जिल्हा अहवाल :

८.०६ लाख शेतकऱ्यांचे नुकसान

७.१३ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना भरपाई ₹४४५ कोटींहून अधिक रक्कम वितरित

१,००० पेक्षा अधिक जनावरांचे मृत्यू

१,३१३ घरांचे नुकसान

७,४७२ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान रस्ते, पूल, वीजवाहिन्या, शाळा, आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा व अंगणवाड्या यांसह ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे.

केंद्रीय पथकाने पाहणी करून जिल्ह्यातील परिस्थितीची नोंद घेतली आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande