
अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.)
राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींची निवडणूकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. पण ही आचारसंहिता अमरावती महापालिकेला लागु होणार नाही असे मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अमरावती महापालिकेच्या अनेक नवीन कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूकीची घोषणा झाल्यापासुन आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान आणि मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता अमरावती महापालिकेला लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आचारसंहिता पालिकेला लागू झाली असती तर अनेक नवीन कामांच्या निविदा आणि कामे रखडली असती. पण या निवडणुकीची आचारंसहिता संबंधित नगरपालिका आणि नगरपंचायती क्षेत्रापुरती आहे. त्यामुळे अमरावती महापालिकेला या निवडणुकीची आचारसंहिता लागु होत नाही. या संदर्भात मनपा अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, या संदर्भात राज्याच्या सचिवाकडे विचारणा केली. त्यावर नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूकीसाठीची आचारसंहिता पालिकेला लागू होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी