पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्यामध्ये ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करावी, त्यानंतर त्यावर हरकती सूचना माग
पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल


पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्यामध्ये ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करावी, त्यानंतर त्यावर हरकती सूचना मागविणे, योग्य हरकतींची दखल घेऊन मतदार यादी मध्ये बदल करणे, त्यानंतर मतदार केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करणे असा कार्यक्रम जाहीर केलेला होता. यामध्ये १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार होती.मात्र आता या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. यात १२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande