अमरावतीत सहा हजारांवर मतदारांची नावे दोन, तीन, चार वेळा ! दुबार नावांमुळे सर्वत्र मोठा गोंधळ
अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.) ६६८९ मतदारांच्या नावाची तब्बल १३५१३ वेळा नोंद असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही नावे दुबारच नाही तर तिबार आणि कळस म्हणजे काही नावे चार वेळा मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोंबर रोज
सहा हजारांवर मतदारांची नावे दोन, तीन अन् चार वेळा !  मतदारयादीतील दुबार नावे सर्वत्र मोठा गोंधळ


अमरावती, 5 नोव्हेंबर (हिं.स.)

६६८९ मतदारांच्या नावाची तब्बल १३५१३ वेळा नोंद असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे ही नावे दुबारच नाही तर तिबार आणि कळस म्हणजे काही नावे चार वेळा मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोंबर रोजी मतदारयादीतील 3 बार नावांबाबत उपाययोजनांसाठी मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ५वरी१८२३. या प्रणालीवर दुबार रिपोर्ट टॅबनुसार ही दुबार नावे (**) अशी चिन्हांकित केली आहे.

निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदारयादीत नवीन नावे समाविष्टकरणे, नावे वगळणे तसेच त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोग तसेच यानिवडणुकांसाठी प्राधिकृत केलेल्याअधिकाऱ्यांना नाहीत. मत्र मतदारयादी बिनचूक पाहिजे, यासाठी आयोगाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून दुबार रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर एकापेक्षा अधिकवेळा आल्याची यादी तपशिलांसह निवडणूक विभागाला मिळते. यामध्ये दुबार नावे चिन्हांकित करण्यात आलेली आहे व या मतदारांचे नाव, लिग, पत्ता व छायाचित्र याची आता प्राथमिक तपासणी केल्या जाणार मतदारयादीत किती मतदारांची नावे असल्याची माहिती आहे.

हमीपत्र दिल्यास होणार मतदान

यादीतील दुबार मतदारांच्या प्राथमिक तपासणीत त्यांना कुठे मतदान करावयाचेआहे, याची माहिती घेतली जाणार आहे व त्यांनी प्रतिसाद न दिल्यास दुबार मतदार म्हणून यादीत तशी नोंद केल्या जाईल. सदर मतदार मतदानाला आल्यावर कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, याबाबत अर्ज भरून घेतला जाईल व तेथे हमीपत्र दिल्यानंतरच त्याला मतदान करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande