सरकारने कर्जमुक्ती न केल्यास रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांचा आक्रोश मांडू - उद्धव ठाकरे
बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य सरकारने कर्जमुक्त केले नाही तर रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांचा आक्रोश मांडू असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची संवाद साधताना म्हटले. उद्धव ठाकरे यांनी पाली (जि. बीड) येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साध
राज्य सरकारने कर्जमुक्त केले नाही तर रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांचा आक्रोश मांडू


बीड, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्य सरकारने कर्जमुक्त केले नाही तर रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांचा आक्रोश मांडू असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची संवाद साधताना म्हटले. उद्धव ठाकरे यांनी पाली (जि. बीड) येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री कर्जमाफीचा मुहूर्त जूनमध्ये काढला आहे. लाडकी बहीण निवडणूक पर्यंत घरातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता आता अनेक अटी लावून लाभार्थी कमी केले जात आहे. शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे का याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. कर्जमाफी नंतर शेतकरी मतदान करतील अशी भूमिका ठेवावी. कर्जमुक्ती केली तरच येणार्‍या निवडणुकीत मतदान करू असे ठाम पणे सांगा. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. जगातली सर्वात मोठे नुकसान भरपाई कुठे आहे असा प्रश्न विचाराला.

देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली कर्जमुक्ती शेतकर्‍यांना मिळालीच नाही. शेतकरी फुकट नव्हे तर हक्काची कर्जमुक्ती मागत आहे. सरकारच मत चोरी करून आले आहे तर त्यांना जाब विचारला गेलाच पाहिजे. विरोधी पक्षनेते नसताना अंबादास दानवे शेतकर्‍यांसाठी फिरत आहे. मी तुमच्यात असताना राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये आहे. बिहारवर अधिक प्रेम असताना महाराष्ट्र सावत्र आहे का? असा प्रश्न उपस्थित केला..

शेतकर्‍यां सोबत शिवसेना उभी आहे. शेतकरी म्हणुन एकत्र आलो तर कोणतेही सरकार झुकू शकते तर राज्य सरकार का झुकणार नाही. शेतकरी बांधव यांनी धीर सोडू नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande