
परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी येथील कारेगाव रस्त्यावरील श्री व्यंकटेश्वर मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवामुळे संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.
संध्याकाळी भक्तांनी मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने दिवे लावून भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. शेकडो दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. भक्तांनी ‘गोविंदा गोविंदा’च्या जयघोषात भावपूर्ण वातावरण निर्माण केले.
या वेळी मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि आरतीचे आयोजनही करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि प्रकाशाचा संगम झालेल्या या दीपोत्सवाने परभणीतील भक्तांना अविस्मरणीय अनुभव दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis