
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्या जमीन खरेदी व्यवहार घोटाळ्या प्रकरणी विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
त्या सर्व घडामोडी दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्याच्या बैठकीसाठी पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळया प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, थांबा जरा आताच उतरलो ना ? अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्याच्या बैठकीसाठी पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळया प्रकरणी विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु