पुणे महापालिकेने सुरू केली ‘पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रकल्प कार्यान्वित करण्याची तयारी
पुणे, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। ‘शहरातील गरजू रुग्णांना कमी दरात कर्करोगाची तपासणी करता यावी, यासाठी ‘पेट स्कॅन’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ‘पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रकल्प’ कार्यान्व
पुणे महापालिकेने सुरू केली ‘पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रकल्प कार्यान्वित करण्याची तयारी


पुणे, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। ‘शहरातील गरजू रुग्णांना कमी दरात कर्करोगाची तपासणी करता यावी, यासाठी ‘पेट स्कॅन’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ‘पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रकल्प’ कार्यान्वित करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. पुढील काही महिन्यांतच हा प्रकल्प सुरु होईल,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांत सध्या ‘पेट स्कॅन’ची सुविधा नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. खासगी रुग्णालयांचे दर परवडणारे नसल्याने अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कमी दरात ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वारगेट येथील हिराबाग आरोग्य कोठी शेजारी सुरू असलेल्या वसंतदादा पाटील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका आयुक्त राम यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात पाहणी केली. आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande