अमरावती जिल्ह्यासाठी 'आधारभूत' खरेदी केंद्रांना मंजुरी
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत धान (भात) आणि भरडधान्य (ज्वारी, बाजरी, इ.) खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत एकूण 12 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. खरेदी केंद्र निवड समि
अमरावती जिल्ह्यासाठी 'आधारभूत' खरेदी केंद्रांना मंजुरी; शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन


अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत धान (भात) आणि भरडधान्य (ज्वारी, बाजरी, इ.) खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत एकूण 12 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. खरेदी केंद्र निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ही मान्यता प्रदान केली आहे. जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, अचलपूर आणि चांदूर बाजार या तालुक्यांतील प्रत्येकी एक, अशा 4 सामान्य खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून, ही केंद्रे तालुका खरेदी विक्री संस्थांमार्फत चालवली जातील. याव्यतिरिक्त, धारणी आणि चिखलदरा या आदिवासी बहुल तालुक्यांतील अनुसूचित जनजाती क्षेत्रासाठी विशेषतः 8 खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत ही केंद्रे चालवली जातील. यामध्ये धारणी तालुक्यात सावलीखेडा, साद्रावाडी, धारणी, चाकर्दा, हरिसाल, बैरागड तसेच चिखलदरा तालुक्यात आणि गौलखेडा बाजार येथील केंद्रांचा समावेश आहे. तसेच विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे , जिल्हा मार्केटिंग अधिकारी बिसेने, विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनचे विधळे, आदिवासी विकास महामंडळाचे संतोष आमटे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खरेदी प्रतिनिधींनी शासनाच्या धोरणानुसारच शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची आधारभूत किंमतीने विक्री करण्यासाठी लवकरात लवकर शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी येरेकर यांनी केले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande