अमरावती : वाहन चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : गाडगेनगर हद्दीतून चोरी गेलेल्या एका ऑटोचा गुन्हे शाखा पोलिस शोध घेत होते. दरम्यान पोलिस शोधात जमिल कॉलनी भागात पोहोचले. त्यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेलेल्या ऑटोसह अन्य एक ई रिक्षा या दोन वाहनांसह अन
गुन्हे शाखेची धडक कारवाई; चोरीचा ऑटो व सुटे भाग जप्त गाडगेनगरातील ऑटो चोरी प्रकरणाचा तपास गतीमान पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले चोरीच्या ऑटोचे जाळे


अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : गाडगेनगर हद्दीतून चोरी गेलेल्या एका ऑटोचा गुन्हे शाखा पोलिस शोध घेत होते. दरम्यान पोलिस शोधात जमिल कॉलनी भागात पोहोचले. त्यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेलेल्या ऑटोसह अन्य एक ई रिक्षा या दोन वाहनांसह अनेक वाहनांचे सुटे भाग सापडले आहे. पोलिसांनी एका भंगार व्यावसायिकाच्या घरातून चोरी गेलेल्या लाल रंगाच्या ऑटोचे सुटे भाग ताब्यात घेतले असून उर्वरित सुटे भाग ज्या वाहनांचे आहे, त्याचाही तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी दुपारी केली आहे.अब्दुल मुफिज अब्दुल मुजीब (२५, रा.जमील कॉलनी, अमरावती) असे ताब्यात घेतलेल्या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी ऑटो चोरीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना एका भंगारच्या दुकानात एक वाहन स्क्रॅप करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे भंगार दुकान मालक अब्दुल मुफिस अब्दुल मुजिद याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून कोतवाली पोलिस ठाण्यात नोंद चोरीच्या गुन्ह्यातील ऑटोची बॅटरी व काही सुटे भागदेखील मिळून आले. तेथून महावितरणच्या वीज वाहिनीचे ॲल्युमिनियम तार व इतर साहित्य सुद्धा मिळून आल्याने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारचे आणखी कोणी स्क्रॅप व्यावसायिक आहेत का, याचा गुन्हे शाखा सखोल तपास करत आहे. दोन दिवसांपासून गुन्हे शाखेच्या पथकाकडून स्क्रॅप घेणाऱ्या लोकांची तपासणी सुरू केली आहे. त्यातून चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येत आहेत. शहरातील चोरी जाणारे वाहने बेकायदेशीर स्क्रॅप करणाऱ्या काही लोकांकडून खरेदी करून त्याची विल्हेवाट लावत असल्याचे निष्पन्न होत आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण, एपीआय अमोल कडू, एपीआय मनीष वाकोडे व त्यांच्या पथकाने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande