“पहिले आक्रमणकर्ते ब्रिटिश नव्हते, त्यापूर्वी इस्लामचा हल्ला झाला” – मोहन भागवत
बेंगळुरू, 08 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतावर आक्रमण करणारे विदेशी म्हणून इंग्रजांकडे पाहिले जाते. परंतु, पहिले आक्रमक ब्रिटिश नव्हते. त्यापूर्वी शक, हूण, कुषाण आणि यवन यांच्यापासून झाली. त्यानंतर इस्लामी आक्रमक आले आणि शेवटी इंग्रजांनी राज्य केल्याचे
डॉ. मोहन भागवत, बंगळुरू येथे मार्गदर्शन करताना


बेंगळुरू, 08 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतावर आक्रमण करणारे विदेशी म्हणून इंग्रजांकडे पाहिले जाते. परंतु, पहिले आक्रमक ब्रिटिश नव्हते. त्यापूर्वी शक, हूण, कुषाण आणि यवन यांच्यापासून झाली. त्यानंतर इस्लामी आक्रमक आले आणि शेवटी इंग्रजांनी राज्य केल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज, शनिवारी केले. कर्नाटकच्या बंगळुरू येथे संघ शताब्दी निमित्त आयोजित 2 दिवसीय व्याख्यानमालेत बोलत होते.

या दोन दिवसीय कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ, डॉ. के. राधाकृष्णन, डॉ. वी. नारायणन, क्रिस गोपालकृष्णन, टी.व्ही. मोहनदास पाई, डॉ. मोहन मंगनानी, राहुल बाल्डोटा, लेफ्टनंट जनरल ए.के. चौधरी, लेफ्टनंट जनरल बी.एस. राजू, एअर मार्शल एम.के. गुलेरिया, डॉ. विक्रम संपत आणि “होम्बले फिल्म्स”चे विजय किरगंदूर यांसह अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.

याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारताचा इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीय ओळख यांवर सविस्तर विचार मांडताना ते म्हणाले की, भारताचा आत्मा त्याच्या विविधतेत आणि एकतेत आहे. परंतु आज आपण “आत्मविस्मृती”चे बळी ठरलो आहोत. “जेव्हा आपण विसरतो की आपण कोण आहोत, तेव्हा आपण हेही विसरतो की आपले कोण आहेत. भारतात कोणीही परका नसून सर्वजण कधीकाळी हिंदूच होते. आपल्या सर्व तत्त्वज्ञानांचे सार एकच आहे – आपण सर्व एक आहोत. “धर्म” या शब्दाचा अर्थ फक्त “रिलिजन” असा नसून “जीवनाचा मार्ग” असा आहे, आणि संस्कृती म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर ती आपल्या संस्कारांची आणि चेतनेची अभिव्यक्ती असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. गुरु नानक देवांचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, नानकांनी भारताची ओळख स्पष्ट केली.

संघाची आत्मनिर्भरता आणि विचारयात्रा

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त बोलताना भागवत म्हणाले की, आरएसएसने गेल्या 100 वर्षांत अनेक विरोधांचा सामना केला, पण कधीच कोणाकडून मदत मागितली नाही. त्यांनी सांगितले, “आम्ही वर्षातून फक्त एकदाच दक्षिणा घेतो. मन, धन आणि शक्ती – या तिन्ही बाबतीत संघ आत्मनिर्भर आहे.”संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, ते अनुशीलन समितीचे सक्रिय सदस्य होते आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेला अवैध मानले होते. भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू असणे म्हणजे देशाबद्दल जबाबदार असणे. विविधता ही आपली सजावट आहे, आणि एकता ही आपली ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघाचे कार्य समाजात एकता प्रस्थापित करणे हे आहे. “आपले उद्दिष्ट संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधणे आहे. विरोध फक्त मुखापर्यंत असावा, हृदयात नाही. विरोधकही आपल्यासाठी उपयुक्त असतात, जसे ‘निंदक नियरे राखिए’ असे म्हणत सरसंघचालकांनी सर्वांच्या एकत्रीकरणाची भूमिका मांडली.-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande