
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)। गोवर्धन शिवारातील फाशीच्या डोंगराजवळ अज्ञात व्यक्तीचा निघृण खून उघडकीस आल्यापासून अवघ्या २४ तासांत नाशिक तालुका पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गोवर्धन शिवारातील निर्जनस्थळी धारदार हत्याराने वार करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती नाशिक तालुका पोलिसांना मिळाली होती. मृताच्या चेहऱ्यावर सुकलेल्या रक्तामुळे ओळख पटणे कठीण झाले होते. पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दोन तपास पथके तयार करून अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यानंतर | तपास पथकाने एमआयडीसीतील कंपन्यांना मृताचे फोटो पाठविले. ऋषिकेश पांडे (रा. सातपूर) यांनी मृताची ओळख अरविंद ऊर्फ पप्पू पशुपतीनाथ पांडे (वय ४०, रा. सातपूर, मूळ रा. भोजपूर, बिहार) अशी ओळख पटवून दिली.
दारू दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासताना मृतासोबत दोन संशयित मंजय पंडित व धर्मेंद्र पंडित (दोघेही मूळ बिहार) हे मोटारसायकलवरून मृतास घेऊन जाताना आढळले. गुप्त बातमी-दारामार्फत संशयित मंजय पंडितचा पत्ता मिळवत तत्काळ तपास पथक बिहारमध्ये रवाना करण्यात आले. तेथे आरोपी मंजय केशव पंडित याला अटक करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीत त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि रक्ताने माखलेले कपडे हस्तगत करून दिले.
मुख्य आरोपी धर्मेंद्र पंडित हा वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे असल्याची माहिती मिळाल्याने दुसरे पथक तेथे रवाना झाले. अथक प्रयत्नांनंतर धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती (वय २६, मूळ रा. छपरा, बिहार) यास ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत प्रभारी अधिकारी इन्स्पेक्टर मृदुला नाईक, सपोनी दीपक बिरारी, पोहवा गायकवाड आदी तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे बहिरम व गिलबिले यांनी कामगिरी बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV