
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी, दि. 15 डिसेंबर रोजी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे नगरपरिषदेने सूचित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी