
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत येत्या २० डिसेंबर रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि अन्य संस्थांतर्फे रत्नागिरीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल (कोल्हापूर), उदयजी सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रुग्णांसाठी हे शिबिर होणार आहे.
लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट आणि पित्शयातील खडे काढण्याचे ऑपरेशन याबाबत शिबिरात नोंदणी केली जाईल. नोंदणीचे शिबिर शनिवार, दि. 20 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयात होईल. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिबिराचा प्रारंभ होईल. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी 89287 36999 या क्रमांकावर संपर्क साधावा.
नोंदणी आणि प्राथमिक तपासणीनंतर पुढील सर्व उपचार व ऑपरेशन कोल्हापूरच्या अथायु हॉस्पिटलमध्ये केले जातील. शिबिराचे संयोजन मंगेश चिवटे उपमुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे माजी कक्षप्रमुख तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मंगेश चिवटे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी