सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या खराब फॉर्मवर अभिषेक शर्माने मौन सोडले
धर्मशाला, 15 डिसेंबर (हिं.स.)टीम इंडियाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या खराब फॉर्मवर एक महत्त्वाचे विधान केले आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू तिसऱ्या टी-२० मध्ये अपयशी ठरले. अभिषेक म्हणाला की, दोघेही २०२६ च्या टी-२०
शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा


धर्मशाला, 15 डिसेंबर (हिं.स.)टीम इंडियाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या खराब फॉर्मवर एक महत्त्वाचे विधान केले आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू तिसऱ्या टी-२० मध्ये अपयशी ठरले. अभिषेक म्हणाला की, दोघेही २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतासाठी सामने जिंकून देतील. तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अभिषेक शर्मा म्हणाला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. विश्वास ठेवा. सूर्या आणि अभिषेक दोघेही पुढील वर्षीच्या विश्वचषकात भारतासाठी सामने जिंकून देतील. मी शुभमनसोबत बराच काळ खेळलो आहे, म्हणून मी त्याला ओळखतो. गिल कुठे उत्कृष्ट कामगिरी करू शकतो हे मला माहिती आहे. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो लवकरच त्याचा फॉर्म परत मिळवेल.

टी-२० च्या बाबतीत सूर्या आणि गिलसाठी हे वर्ष सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. सूर्याने १४.२० च्या सरासरीने आणि १२५.२९ च्या स्ट्राईक रेटने फक्त २१३ धावा केल्या आहेत. एका वर्षात २०० टी-२० धावा करणाऱ्या कोणत्याही पूर्णवेळ कर्णधारासाठी ही सरासरी सर्वात कमी आहे. दरम्यान, गिलने २४.२५ च्या सरासरीने आणि १३७.२६ च्या स्ट्राईक रेटने २९१ धावा केल्या आहेत. सप्टेंबरमध्ये सलामीवीर म्हणून संघात परतलेल्या गिलने आतापर्यंत फक्त एक अर्धशतक केले आहे.

गिलने त धर्मशाला टी-20 सामन्या२८ चेंडूत २८ धावा केल्या, तर सूर्या फक्त ११ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. दोन्ही क्रिकेटपटू यापूर्वी दोन टी-२० सामन्यांमध्ये अपयशी ठरले आहेत. २०२६ चा टी-२० विश्वचषक दोन महिन्यांवर आहे आणि त्यापूर्वी दोन्ही खेळाडूंना त्यांचा फॉर्म परत मिळवावा लागेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande