अबू धाबीत उद्या आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव
नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १९ व्या हंगामासाठीचा मिनी लिलाव उद्या अबू धाबी येथे सुरू होत आहे. १० संघांकडे २३७.५५ कोटी रुपये (अंदाजे १.५ अब्ज डॉलर्स) इतके पैसे आहेत. लिलावात ३५० क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. पण
आयपीएल ट्रॉफी संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १९ व्या हंगामासाठीचा मिनी लिलाव उद्या अबू धाबी येथे सुरू होत आहे. १० संघांकडे २३७.५५ कोटी रुपये (अंदाजे १.५ अब्ज डॉलर्स) इतके पैसे आहेत. लिलावात ३५० क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. पण केवळ ७७ क्रिकेटपटूंची विक्री होईल, कारण उपलब्ध जागा फार कमी आहेत. ४० क्रिकेटपटूंसाठी सर्वाधिक बेस प्राईस २ कोटी रुपये आहे.

आयपीएल मिनी लिलावात, संघ अनेकदा काही विशिष्ट क्रिकेटपटूंवर मोठी रक्कम खर्च करतात. सहा क्रिकेटपटूंना १६ कोटी रुपयांपेक्षा जास्तमध्ये खरेदी केले गेले आहे. लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू ऋषभ पंतला गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात विकण्यात आले होते. त्याला लखनऊ सुपरजायंट्सने २७ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील दोन फ्रँचायझी लीग, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) आयोजित करते. बीसीसीआय १६ डिसेंबर रोजी आयपीएल मेगा लिलाव देखील आयोजित करेल. यावेळीही मल्लिका सागर लिलावकर्ता असेल.

आयपीएलमध्ये दर तीन वर्षांनी एकदा मेगा लिलाव होतो. संघ फक्त सहा क्रिकेटपटूंना कायम ठेवू शकतात. ज्यामुळे अधिक क्रिकेटपटू खरेदी करता येतात. मेगा लिलाव दरम्यान दर दोन वर्षांनी एक मिनी लिलाव आयोजित केला जातो. संघ अधिक क्रिकेटपटूंना कायम ठेवू शकतात. कमी क्रिकेटपटू खरेदी केले जातात, म्हणून मिनी लिलाव असे नाव देण्यात आले. २०२५ च्या आयपीएलसाठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता, म्हणून २०२६ आणि २०२७ च्या आयपीएलसाठी मिनी लिलाव आयोजित केले जातील.

जगभरातील १,३९० क्रिकेटपटूंनी लिलावासाठी नोंदणी केली. पण संघांनी यापैकी काही क्रिकेटपटूंची निवड केली आणि त्यांना मिळविण्यात रस दर्शविला. म्हणून, लिलावापूर्वी, बीसीसीआयने टॉप ३५० क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली. उद्याच्या लिलावात फक्त त्यांची नावे समाविष्ट केली जातील.

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कडे सर्वाधिक रिकाम्या जागा आहेत, ज्यामध्ये १३ क्रिकेटपटू आहेत. संघाने फक्त १२ क्रिकेटपटूंना कायम ठेवले आहे आणि लिलावात सहा परदेशी क्रिकेटपटूंना घेईल. पंजाब किंग्ज (पीबीकेएस) कडे सर्वात कमी रिकाम्या जागा आहेत, फक्त चार. मागील उपविजेत्या संघाने २१ क्रिकेटपटूंना कायम ठेवले आहे. एका संघात २२ ते २५ खेळाडू सामावून घेता येतात. पंजाबनंतर, मुंबई इंडियन्स (एमआय) आणि गुजरात टायटन्स (जीटी) कडे प्रत्येकी पाच रिकाम्या जागा आहेत.

सर्वात कमी क्रिकेटपटूंना कायम ठेवणाऱ्या केकेआरकडे सर्वात जास्त पर्स आहे. त्यांच्याकडे ६४.३० कोटी एवढी रक्कमआहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ४३.४० कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमआयकडे सर्वात कमी पर्स आहे. म्हणजेच २.७५ कोटी. आरसीबी, आरआर, पीबीकेएस आणि जीटीकडे ११ ते १७ कोटींपर्यंतचे पर्स आहेत. दरम्यान, डीसी, एलएसजी आणि एसआरएचकडे २१ कोटी ते २६ कोटींपर्यंतचे पर्स आहेत.

१० संघांनी १७३ क्रिकेटपटूंना कायम ठेवले आहे, त्यापैकी ४५ परदेशी क्रिकेटपटू आहेत. दहा संघांमध्ये २५० क्रिकेटपटूंचा समावेश असू शकतो, त्यापैकी ८० परदेशी क्रिकेटपटू असणे आवश्यक आहे. याचा अर्थ लिलावात ७७ जागा रिक्त आहेत, परंतु यापैकी २५ जागा परदेशी क्रिकेटपटूसांठी आहेत. याचा अर्थ फक्त ५२ भारतीय क्रिकेटपटू विक्रीसाठी उपलब्ध असतील.

आयपीएल हंगाम संपल्यानंतर क्रिकेटपटूंच्या खरेदी-विक्रीची विंडो उघडते आणि लिलावाच्या एक महिना आधीपर्यंत चालू राहते. यावेळी, संघांनी आठ क्रिकेटपटूंची देवाणघेवाण केली. त्यापैकी तीन मोठी नावे संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी होती. सॅमसन राजस्थानहून चेन्नईला, जडेजा चेन्नईहून राजस्थानला आणि शमी हैदराबादहून लखनऊला गेला.

यावेळी आयपीएलच्या मिनी लिलावात फारशी मोठी नावे सहभागी होत नाहीत. आंद्रे रसेल, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस आणि मोईन अली सारखे अनुभवी खेळाडू नोंदणीकृत नव्हते. परिणामी, फक्त तरुण ऑस्ट्रेलियन कॅमेरॉन ग्रीन, श्रीलंकेचा मॅथिस पाथिराणा, भारताचा रवी बिश्नोई, इंग्लंडचा जेमी स्मिथ आणि फॉर्ममध्ये नसलेल्या लियाम लिव्हिंगस्टोन यांनाच उच्च बोली लागण्याची शक्यता आहे.

भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या काही क्रिेकेटपटूंसाठी बोली लावल्याने आश्चर्य वाटू शकते. त्यापैकी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी हा सर्वाधिक चर्चेत असलेला क्रिकेटपटू आहे. त्याच्याशिवाय, संघ फिरकीपटू प्रशांत वीर, शिवम शुक्ला, वेगवान गोलंदाज अशोक शर्मा, क्रेन्स फुलेत्रा आणि यष्टीरक्षक कार्तिक शर्मा यांच्यावरही मोठी रक्कम खर्च करू शकतात.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटूचा विक्रम भारताच्या ऋषभ पंतच्या नावावर आहे, ज्याला गेल्या हंगामात लखनऊ सुपरजायंट्सने २७ कोटींमध्ये खरेदी केले होते. त्याच्या पाठोपाठ पंजाब किंग्जचा श्रेयस अय्यरचा क्रमांक लागतो, ज्याला गेल्या हंगामात २६.७५ कोटी मिळाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande