वेध राष्ट्रीय जनगणनेचे : कर्मचा-यांचे प्रशिक्षण सुरू
अकोला, 17 डिसेंबर (हिं.स.)। २०२७ च्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेची प्रशासकीय तयारी सुरू झाली असून, कर्मचा-यांच्या प्रशिक्षणालाही प्रारंभ झाला आहे. त्यात महाराष्ट्र जनगणना संचालनालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या वतीने कार्यशाळा नियोजनभवनात आज झाल
P


अकोला, 17 डिसेंबर (हिं.स.)।

२०२७ च्या राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेची प्रशासकीय तयारी सुरू झाली असून, कर्मचा-यांच्या प्रशिक्षणालाही प्रारंभ झाला आहे. त्यात महाराष्ट्र जनगणना संचालनालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या वतीने कार्यशाळा नियोजनभवनात आज झाली. विश्वासार्ह आकडेवारी गोळा करण्यासाठी अद्ययावत साधने व यंत्रणेची तरतूद असून, अधिकारी-कर्मचा-यांनी प्रक्रियेतील प्रत्येक तरतूद काळजीपूर्वक जाणून घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात नियोजनभवनात तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील,जनगणना संचालनालयाचे श्री.भगत, श्री.साळगावकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय मानकांचा अवलंब करत अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार आहे. अचूक आणि विश्वासार्ह लोकसंख्या आकडेवारी गोळा करण्यासाठी मोबाइल ॲप्लिकेशनबरोबरच संपूर्ण देखरेखीसाठी केंद्रीय पोर्टलचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

जनगणना संचालनालयाचे श्री. भगत म्हणाले की, राष्ट्रीय जनगणना कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करण्यात येईल. ही देशातील पहिली डिजिटल पद्धतीने जनगणना होणार असून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही आवृत्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या मोबाइल ऍप्लिकेशन्सचा वापर करून डेटा गोळा केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande