नाशिक मनपा निवडणुकीसंदर्भात बैठकीद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)। - नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीची बैठक मनपा आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत मनपाच्या ६ विभागीय कार्यालयातील ३१ प्रभागांसाठी होत असलेल्या निवडणूक कार्यक्रमात सर्व निवडणूक निर्णय अधि
नाशिक मनपा निवडणुकीसंदर्भात बैठकीद्वारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन


नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)।

- नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीची बैठक मनपा आयुक्त कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीत मनपाच्या ६ विभागीय कार्यालयातील ३१ प्रभागांसाठी होत असलेल्या निवडणूक कार्यक्रमात सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या. यावेळी विविध विभागातील अधिकाऱ्यांची ओळख परिचय करून देण्यात आली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीकरिता नियुक्त केलेले विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र, नागरिकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून निवडणूक निकाल लागेपर्यंत विविध विषयांवर चर्चा झाली. नाशिक महानगरपालिका निवडणूक कामकाज पारदर्शक पद्धतीने व बिनचूक राबविण्यात यावे, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी यावेळी केले. महाराष्ट्र निवडणूक आयो आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार निवडणूक पार पाडावी, अशा सूचना मनपा निवडणूक विभागाचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande